मुंबई : श्रावण आणि अधिक महिना राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस घेऊन आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही चांगली गोष्टच म्हणायला हवी. सर्वसामान्य लोकांसाठी अलर्ट तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वीची बातमी आहे. हवामान विभागाने दोन ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे.
संपूर्ण कोकणात पुढचे पाच दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे पाच दिवस नागरिकांना काळजी घेण्याचं आणि समुद्र किनाऱ्यावर न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
21 जुलै रोजी रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या भागांमध्ये मुसळधार पाऊस राहील असा इशारा देण्यात आला आहे. अनेक भागांमध्ये आधीच झालेल्या मुसळधार पावसानं रस्त्याची जाळण झाली आहे. तर छोटे पूल वाहून गेले आहेत.
पुढील 2 दिवस मध्य भारताच्या काही भागांत जोरदार ते खूप जोरदार होण्याची शक्यता. कोकणचा काही भाग, सातारा,पुणे नाशिकचा घाट क्षेत्र आणि किनारी आंध्रचा काही भाग पेक्षा थोडा जास्त असेल असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.