अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यात बाष्पाचं प्रमाण वाढले आहे. दुपारनंतर ढग जमा होऊन विजांच्या कडकडाटासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सातारा, सांगली, सोलापूर, अकोला, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर उष्णतेत वाढ झाल्याने काही ठिकाणी दुपारनंतर ढगाळ वातावरण होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाचाही अंदाज आहे.