गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सांगलीतील विष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये हापूस आंबा दाखल झाला आहे. यावेळी आंब्यांच्या पेट्यांचे विधिवत पूजन करून नवीन आंबा सौद्याचा शुभारंभ करण्यात आला. एक डझन देवगड हापूस आंब्यास 400 ते 1 हजार रुपये इतका भाव मिळाला. एप्रिलनंतर मोठ्या प्रमाणात आंबा ग्राहकास उपलब्ध होणार आहे. यावेळी हापूस आंब्याचे दरही आवाक्यात असल्याने सामान्य जनतेला आंब्यांची चव चाखता येणार आहे. सांगली फळ मार्केट हे पश्चिम महाराष्ट्रातील आंब्याची मोठी बाजारपेठ असून, कोकणातील चांगला अंब्याला इथं चांगला भाव मिळतो. शेतकऱ्यांच्या विक्रीसाठी आणि ग्राहकांच्या खरेदीसाठी सांगलीतील मार्केटला पहिली पसंती असते.