मानवाप्रमाणेच सर्व पशु-पक्षीही निसर्गाचा भाग आहेत. मात्र, मानवी हस्तक्षेपामुळे अनेकदा पशु-पक्षी संकटात येतात.
लातूरमध्ये मानवाच्या कायदा व सुव्यवस्थेसाठी काम करणारा पोलीस कर्मचारी पशु-पक्षांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठीही कार्यरत आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयात फिंगरप्रिंट डिपापर्टमेंटला काम करणारे धनंजय गुट्टे यांना वाइल्ड लाईफ फोटोग्राफीचा छंद आहे.
आपल्या कॅमेरातून ते निसर्गातील सौंदर्य टिपत असतात. पशु-पक्षांच्या विविध भावमुद्रा ते कॅमेराबद्ध करतात.
वाइल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी धनंजय गुट्टे यांना चार राज्यस्तरीय व दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
धनंजय हे महाविद्यालयीन शिक्षण घेत असाताना पशु-पक्षांवरील डॉक्युमेंटरी करत असत. त्यासाठी त्यांना प्राणी आणि वनस्पतींचे फोटो लागायचे.
धनंजय सुरुवातीला इंटरनेटवरून फोटो घेत होते. परंतु, पुढे त्यांनी स्वत: फोटो घेऊन ते वापरायला सुरुवात केली. यातूनच त्यांना वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा छंद लागला.
वाइल्ड लाईफ फोटोग्राफीतून निसर्गाबद्दल आवड निर्माण झाली. पशु, पक्षी, किटक, वनस्पती यांचा अभ्यास सुरू केल्याचे धनंजय सांगतात.
निसर्गात भटकंती करताना आपली ओळख लपून जात असल्यास खूप काही सुंदर गोष्टी पाहायला मिळतात, असे धनंजय सांगतात.