कोल्हापुरातील दिवसभर ऊन आणि संध्याकाळच्या वेळी अंशतः ढगाळ वातावरण पाहायला मिळत असल्यामुळे वातावरणात थोडा उकाडा जाणवत आहे. सध्या शेतकऱ्यांसह सर्वच कोल्हापूरकरांना मान्सूनची ओढ लागलेली आहे. मात्र यंदाचा मान्सून थोडा उशीराने येणार असल्याने सर्वांना वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान कोल्हापुरात काल (26 मे) रोजी कमाल तापमान 34° सेल्सिअस तर किमान तापमान 23° सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. आज (27 मे) रोजी देखील कमाल तापमान 34° सेल्सिअस तर किमान तापमान 23° सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. मात्र तापमान जरी सारखेच राहणार असले तरी आज आकाश पूर्णतः मोकळे राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.