कोल्हापूर, 28 जानेवारी : मुंबईचा वडापाव आता राज्यभर फेमस झालाय. कोणत्याही भागात वडापावचे स्टॉल आपल्याला हमखास दिसतात. तो खाण्यासाठी मोठी गर्दीही होत असते.
कोल्हापुरातील महावीर कॉलेज परिसरात राहणारे मयूर भोसले हे त्यांच्या स्टॉलवर चिकन वडापाव सुरू केलाय. हा प्रकार सुरू करण्यापूर्वी त्यांनी आठवडाभर याची ट्रायल घेतली होती.
मयूर यांचा चिकन 65 आणि चिकन खिमा रोलचा गाडा होता. त्यांना मित्रांनी या प्रकराचा गाडा सुरू करण्याचा सल्ला दिला होता.
बटाटे वडा बनवण्यासाठी बेसन पिठाचे मिश्रण बनवले जाते. हे मिश्रण बनवताना बेसनपीठ, तिखट, मीठ आणि ओवा हे पदार्थ वापरले जातात.
ग्राहकांना खायला देताना पावाला घरगुती पुदिना चटणी, शेजवान चटणी आणि मेयोनिज सॉस लावून मध्ये हा वडा ठेवून दिला जातो.
साधारण बॉम्बे वडापाव हा 10 ते 15 रुपयांना सर्वत्र मिळत असतो. पण या वड्यामध्ये चिकन वापरण्यात आल्यामुळे या वड्याची किंमत 20 रुपये असल्याची माहिती मयूर यांनी दिलीय.