राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील यांचा विवाह आज उद्योगपती राहुल किर्लोसकर यांची कन्या अलिका यांच्यासोबत मोठ्या थाटात पार पडला.
राजारामपूर येथे सांयकाळी साडेपाच वाजता हा विवाहसोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला दिग्गजांची उपस्थित होती.
या शाही विवाहसोहळ्यासाठी तीन प्रकारच्या पत्रिका छापण्यात आल्या होत्या. तब्बल दोन लाख लोकांना या पत्रिकांच्या माध्यमातून विवाह सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं. विवाह सोहळ्यासाठी प्रचंड गर्दी जमल्याचं पहायला मिळालं
या विवाह सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, छत्रपती उदयनराजे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब देसाई, मंत्री शंभूराजे देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, सभापती नरहरी झिरवळ या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती.
प्रतीक पाटील यांनी 2014 पासून वाळवा-इस्लामपूर मतदारसंघात राजकीय कारकीर्द सुरू केली आहे. प्रतीक यांनी आपले शिक्षण लंडनमधून पूर्ण केले आहे. त्यांनी इंजिनीअरिंगमध्ये एमएस केले आहे. सध्या ते मतदारसंघात लक्ष देत आहेत.
तर अलिका किर्लोसकर या उद्योगपती राहुल किर्लोसकर यांच्या कन्या आहेत. अलिका आणि प्रतीक पाटील हे आज विवाहबंधनात अडकले आहेत.
हा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. यासाठी इस्लामपूर येथील वाघवाडी फाट्याजवळ सुसज्ज असे चार हेलिपॅड तयार करण्यात आले होते. भव्य असा स्टेज उभारण्यात आला होता. जवळपास सर्वच पक्षातील प्रमुख नेत्यांनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली.