जालना जिल्ह्यात गाजत असलेल्या क्रिप्टो करंसी प्रकरणी प्रमोटर किरण खरात यांच्याकडून आणखी दोन महागड्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
जीडीसी कॉईनचा प्रमोटर किरण खरात हा पोलिसांना शरण आला असून त्याला दहा तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस चौकशीमध्ये आणखी माहिती मिळाल्यानंतर किरण खरात याच्याकडून आणखी दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहे. खरातकडून जप्त करण्यात आलेल्या गाड्यांची संख्या आता 8 झाली आहे.
घनसावंगी तालुक्यातील किरण खरात हे क्रिप्टो करंसीमध्ये प्रमोटर म्हणून काम करत होते. यात किरण खरात यांना क्रिप्टो करंसीमध्ये बीएमडब्लू कारही गिफ्ट मिळाली होती.
खरात यांना मिळालेल्या पैशांमुळे आकर्षित होऊन अनेकांनी क्रिप्टो करंसीमध्ये पैसे गुंतवले मात्र जागतिक मंदी असल्याने अनेकांचे पैसे बुडाले.