महाराष्ट्रात सर्वत्रच उष्णतेचा पारा चांगलाच चढला आहे. मे महिन्यातील उन्हाळा मराठवाड्यालाही चटके देतोय.
छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान चाळीशीपार गेलंय. त्यामुळे वाढत्या तापमानानं नागरिक हैराण झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवार (28 मे) किमान तापमान 23 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान हे 41 अंश सेल्सियस होते.
आज सोमवार 29 मे रोजी किमान तापमान हे 23°c तर कमाल तापमान 41°c अंश सेल्सिअस एवढे असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी शरीरातील पाण्याची पातळी राखून ठेवणं, उन्हापासून स्वत:चा बचाव करणं या आणि इतर अनेक बाबतीत नागरिकांना सूचित केलं जात आहे. तसेच काम असेल तरच बाहेर पडा. विनाकर घरच्या बाहेर पडून नका, असं आवाहन केलंय.