बीड शहरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. बीड शहरातील बार्शी नाका या परिसरातून भव्य दिव्य असे मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते बाहुबलीचा भव्य देखावा हे या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले. बीडकरांनी हा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी रामभक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीनं ही रॅली काढण्यात आली होती. श्रीरामाच्या वानरसेनेचा देखावाही या शोभायात्रेत साकारण्यात आला होता.