गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज (6 फेब्रुवारी) रोजी पहिली पुण्यतिथी आहे. औरंगाबादचे फोटोग्राफर किशोर निकम यांनी दीदींचे अविस्मरणीय फोटो काढले आहेत.
चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र आहिरे यांच्यामुळे निकम यांना ही संधी मिळाली. विशेष म्हणजे निकम यांनी फक्त 24 तासांमध्ये लतादीदींचे 800 फोटो काढण्याचा विक्रम केला आहे.
लता मंगेशकर यांच्या आपुलकीच्या वागण्यामुळे हे सर्व टेन्शन दूर झालं. दीदींनी या कामात पूर्ण सहकार्य केलं असं निकम सांगतात.
निकम यांनी 2014 साली दीदींचे हे फोटो पुण्यात काढले होते. या फोटोशुटसाठी दीदींचा 24 तास सहवास त्यांना लाभला.
लता मंगेशकर यांची समोरच्यांना आदर देण्याची पद्धत पाहून भारावून गेल्याचा अनुभव निकम यांनी सांगितला.
लतादीदींचे फोटो काढण्याची संधी निकम यांना पुन्हा मिळणार नव्हती. त्यामुळे त्यांनी सर्व अँगलनं जास्तीत जास्त फोटो काढले.
लता मंगेशकर यांनी यावेळी फोटो काढण्यास संपूर्ण सहकार्य केलंच. त्याचबरोबर कॅमेऱ्यामधील आधुनिक तंत्रज्ञानही निकम यांच्याकडून समजून घेतलं.