शालेय विद्यार्थ्यांना सर्वांगिण शिक्षण देण्याची गरज असते. ग्रामीण भागातील बहुतांश मुले ही शेतकरी कुटुंबातील असतात. त्यामुळे त्यांना शाळेतच आधुनिक शेतीचे धडे मिळावेत यासाठी प्रयत्न केले जातात.
2/ 11
महाराष्ट्रातील काही आदर्श शाळांनी हा उपक्रम चांगल्या पद्धतीने राबविला असून त्याचा विद्यार्थ्यांना दुहेरी फायदा होत आहे. यासाठी पालकांचेही सहकार्य मिळत आहे.
3/ 11
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असणारी नांदूर खंदरमाळ येथील लहूचा मळा जिल्हा परिषद शाळा उपक्रमशिल शाळा म्हणून ओळखली जाते.
4/ 11
लहूचा मळा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी खडकाळ जमिनीवर परसबाग फुलवली आहे.
5/ 11
लहूचा मळा या शाळेने पंतप्रधान पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत परसबाग तयार करण्याच्या स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. तर जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला.
6/ 11
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहूचा मळा येथे मुख्याध्यापक रोहिदास गाडेकर, उपशिक्षिका आशा गाडेकर हे दाम्पत्य गत चार वर्षांपासून कार्यरत आहे. उपक्रमशिल शिक्षक अशी त्यांची ओळख आहे.
7/ 11
शाळा खडकाळ जागेत असल्याने गाडेकर दाम्पत्याच्या संकल्पनेतून परसबागेचे नियोजन करण्यात आले. परिसरात मातीचा भराव करून गेटच्या आत वर्गासमोर परसबाग तयार करण्यात आली.
8/ 11
वाफे तयार करत कांदा, लसूण, बटाटा, मुळा, टोमॅटो, फ्लॉवर, कोथिंबीर, मिरची आदी पिकांची लागवड केली. विद्यार्थी स्वतःहून सहभागी झाले.
9/ 11
परसबागेत पाण्याचा कमी प्रमाणात वापर केला जातो. तसेच कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल, असे नियोजन केले आहे.
10/ 11
शाळेतील परसबागेत उत्पादित होणाऱ्या सेंद्रिय भाजीपाल्याचा वापर विद्यार्थ्यांच्या रोजच्या आहारात होतो. त्यामुळे जेवण रुचकर बनत आहे.
11/ 11
शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांत श्रमप्रतिष्ठेचे मूल्य रुजविण्यासाठी शाळेत परसबाग ही संकल्पना राबविण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना शेतीविषयक गोडी निर्माण झाली.