डोंबिवली शहरात कधी काय घडेल याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीमध्ये लाल हिरव्या पाऊस पडला होता. आता पुन्हा डोंबिवलीतील रस्ते लाल झाले आहे.
डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा केमिकलच्या कंपण्यांनी केमिकल पाणी सोडले. MIDC परिसरामध्ये ही घटना घडली आहे. त्यामुळे रस्त्यांवर लाल पाणी साचले आहे.
नाल्याचे चेंबर फुटून सर्व पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. नाल्यात कुत्रा मरुन पडला असून त्याच्या मृतदेहाला अळ्या पाण्यावाटे रस्तावर आल्या आहेत.
रस्त्यावर लालपाणी साचले आहे. याच रस्तातून MIDC कर्मचाऱ्यांना वाट काढत जावं लागतंय. MIDC परिसरात मोठी दुर्गंधी झाली आहे.
रहिवाशी विभागातील लोकांना पुन्हा सोडलेल्या केमिकल धोका निर्माण झाला आहे. याबद्दल स्थानिक वारंवार तक्रारी करत असतात पण अधिकारी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शशिकांत कोकाटे यांनी केला आहे.