हिवाळ्यात अनेकांना सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. त्यामुळे यापासून आराम मिळवण्यासाठी प्रभावी उपाय आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
हिवाळ्यात होणाऱ्या सांधेदुखीच्या त्रासामागे अनेक कारणे असतात. पुरेशा प्रमाणात सकस आहार न घेणे, जंक फूडचा अतिवार, डेस्कवर तासंतास बसून काम करणे यामुळे ही समस्या उद्भवते.
तुम्हालाही सांधेदुखीचा त्रास होत असेल तर काही तेल तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतात. येथे आम्ही तुम्हाला पाच 5 आयुर्वेदिक तेलांविषयी माहिती देत आहोत. यांचा वापर करून तुम्ही सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळवू शकता.
बदाम तेल : बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई असते. त्यामुळे या तेलाने मालिश केल्यास हाडं मजबूत होतात. बदामाच्या तेलाने मालिश करण्यासाठी ते कोमट करून सांध्यांना मसाज करा. तुम्हाला खूप आराम मिळेल.
तिळाचे तेल : तिळाच्या तेलात इतर तेलांपेक्षा जास्त मॉइश्चरायझर असते. यात ओमेगा-3 फॅटी अॅसिड, कॉपर, झिंक, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे घटक आढळतात. सांधेदुखीत या तेलाने मसाज केल्यास आराम मिळतो.
नारळाचं तेल : हिवाळ्यात सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी खोबरेल तेल उत्तम मानले जाते. खोबरेल तेलात अँटी-इंफ्लामेंटरी आणि वेदनाशामक गुणधर्म असतात. या तेलाने मसाज केल्याने सांधेदूखीपासून आराम मिळतो.
ऑलिव तेल : ऑलिव्ह ऑईलने सांध्यांची मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. रात्री झोपताना या तेलाने मालिश करावी.
मोहरीचे तेल : मोहरीच्या तेलाने सूज किंवा कोणत्याही वेदनांमध्ये खूप आराम मिळतो. यासाठी 2 ते 3 चमचे मोहरीच्या तेलात लसणाच्या 2 पाकळ्या टाका आणि ते थोडे गरम करा. थंड झाल्यावर सांधे आणि पायांवर मसाज करा.