लग्न झाल्यानंतर स्त्रिया खूप आनंदी असतात. नवीन आयुष्याच्या प्रवासाविषयी त्या स्वप्नरंजन करू लागतात. परंतु लग्नाच्या काही महिन्यांनंतर त्यांच्यात खूप बदल होतो.
लग्नानंतर पत्नीचा स्वभाव बदलतो असे अनेकदा म्हटले जाते. खरंतर हा आक्षेपार्ह शब्द आहे. परंतु बहुतांश प्रकरणात हे खरं ठरतं.
लग्नानंतर महिलांच्या मनस्थितीत बदल होतात. यासाठी काही सामाजिक पैलू जबाबदार असतात, तर काही हार्मोनल चेन्जेस देखील यासाटी कारणीभूत ठरतात.
सायकॉलॉजी टुडेमधील सर्च रिपोर्टनुसार एकमेकांना डेट केल्यानतंर लग्न आणि त्यानंतर वाद हे अगदी सामान्य आहे. कारण सोबत राहायला लागल्यानंतर मुलींना खूप अॅडजस्टमेंट कराव्या लागतात.
लग्नानंतर स्त्रियांची चिडचिड का वाढते यामागचे कारण रिलेशनशीप स्टडीच्या सर्वेक्षण अहवालातून समोर आले आहे.
मुली आपलं घर सोडून नव्या घरात येतात, या घरात राहताना त्यांना अनेक तडजोडी कराव्या लागतात. यादरम्यान त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
काही मुलींना सासरी ते आपलेपण मिळत नाही जे त्यांना त्यांच्या माहेरी मिळत होतं. यामुळे त्या कायम चिंतेत असतात आणि नंतर त्याचे रुपांतर चिडचिडेपणात होते.
माहेरी मुली जेवढ्या स्वतंत्र असतात, तेवढं स्वातंत्र्य त्यांना सासरी मिळत नाही. पर्सनल स्पेस न मिळ्याल्यामुळे अनेकदा त्यांची चिडचिड होते.
लग्नानंतर बहुतांश मुलींना आपला जॉब सोडावा लागतो. अनेक तडजोडी कराव्या लागतात. यामुळे त्यांच्या इच्छा अर्धवट राहतात आणि त्यांची चिडचिड वाढू लागते.