घरगुती किंवा आजीबाईंचे अनेक नुसके असतात. ज्यांना आपण स्वयंपाक घरापासून ते आयुष्यात इतर गोष्टींसाठी फॉलो करतो. त्यांपैकी काही गोष्टींबद्दल आपल्या पूर्ण माहिती नसते. पण सगळे करतात म्हणून आपण करत असतो.
विड्याचे पान हे खातात, हे तर सगळ्यांना माहित आहे. पण हे पान तुपात देखील टाकतात, या बद्दल तुम्हाला माहितीय? हे का टाकलं जातं आणि त्याचे फायदे काय तुम्हाला माहितीय? चला आपण याबद्दल जाणून घेऊ
विड्याचे पान तूप कढवताना त्यात टाकले तर बरेच दिवस ठेवलेल्या दुधावरील सायीला जो वास येतो, तो हे पान टाकल्याने येणार नाही, तसेच यामुळे तूप छान रवाळ आणि चवीस छान बनते, त्याला कोणताही वास राहत नाही.
त्यामुळे तुपाला एक वेगळा आणि रवाळ वास येईस. जो खाण्यासाठी चांगला लागतो. याच कारणामुळे विड्याचे पान हे तुप कडवताना टाकतात.