वाढलेलं वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे प्रयत्न करतात. मात्र आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याचा एक सोपा मार्ग सांगणार आहोत. इथे दिलेली हिरवी पानं तुमच्या पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतील.
रोज सकाळी कढीपत्त्याची दोन पानं चावून खाल्यास तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. यामुळे तुमचे फॅटदेखील बर्न होतात आणि डायबिटीजचा धोका देखील कमी होतो.
कोथिंबिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि तुमचे मेटाबोलिसम व्यवस्थित असेल तर तुमचे अतिरिक्त वजन कमी होणे सोपे होते.
रोजमेरीची पानं अँटिऑक्सिडंट्सने भरपूर असतात. ही पानं औषधी गुणांनीही समृद्ध असतात, जे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करतात.
आपण जे फास्ट फूड किंवा अनारोग्यकारक अन्न खातो यामध्ये ओरिगॅनो वापरले जाते. मात्र ते ते वेगळे खाल्यास त्याचा फायदा वजन कमी करण्यासाठी होऊ शकतो. कारण यामध्ये पॉलिफेनॉल्स फ्लेवोनॉइड्स यासारखे बायोऍक्टिव्ह कंपाउंड असतात.
पार्सले ही जडीबुटी तुमचे मेटाबॉलिज्म वाढवते. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास फायदा होतो. जे लोक याचा नियमितपणे वापर करतात. त्यांची पचनक्रिया चांगली राहाते.