भारताच्या पशु कल्याण मंडळाने १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेला काउ हग डे म्हणजेच गाईची गळाभेट घेण्याचं आवाहन केलं आहे.
पशु कल्याण मंडळाने गाईची गळाभेट घेण्याबद्दल सांगताना लोकांच्या भावना आणि आनंद यांचा संबंध जोडला आहे. यामुळे भावनात्मक समृद्धी होईल आणि लोकांच्या वैयक्तिक आणि सामूहिक आनंदात भर पडेल असं म्हटलं आहे.
भारताच्या पशु कल्याण मंडळाकडून एक निवेदन जारी करण्यात आलं असून त्यात गाय भारतीय संस्कृती आणि आपल्या जीवन, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचं म्हटलं. गाईला गोमाता म्हणून पाहतो. पण पाश्चात्यांच्या प्रभावामुळे भारतीय वैदिक परंपरा लुप्त होत चालल्या आहेत.
गाईची गळाभेट घेण्याचे काही फायदे असल्याचा दावा वैज्ञानिकांकडून केला जातो. यामुळे मानसिक शांतता मिळते आणि मानसिक विकार दूर होण्यास मदत होऊ शकते असं म्हटलं आहे.
खूप तणाव, चिंता आणि नैराश्यात असणाऱ्यांनी गाईची गळाभेट घ्यायला हवी. त्यांना गोंजारणं, त्यांच्यासोबत वेळ घालवणं फायद्याचं ठरू शकतं असा दावा केला जातो. पशु कल्याण मंडळानेही असाच दावा केलाय.
अमेरिकेत गाईची गळाभेट घेण्याला काऊ कडलिंग म्हणून ओळखलं जातं. कोरोना काळात काउ कडलिंग थेरपी ट्रेंडमध्ये होती. यासाठी लोक २०० डॉलरपर्यंत पैसेही मोजले होते.