बदलत्या काळानुसार सकाळी लवकर उठण्याची सवय तरुणाईमध्ये कमी होत चालली आहे. मात्र जर तुम्हाला सकाळी लवकर उठण्याची सवय लावायची असेल तर आम्ही असे काही उपाय सांगणार आहोत ज्याचा तुम्हाला फायदा होईल.
झोपण्याची वेळ निश्चित करा : सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री वेळेवर झोपण्याची शिस्त असणे आवश्यक आहे. तुम्हाला दररोज कोणत्या वेळी उठायचे आहे आणि त्याच वेळी झोपायला जायचे आहे त्यानुसार तुमची झोपण्याची वेळ निश्चित करा.
रात्री मोबाईल दूर ठेवा : झोपण्यापूर्वी खूप वेळ मोबाईल किंवा टीव्ही बघण्याची जर तुम्हाला सवय असेल तर ती ताबडतोब बदला. कारण यामुळे आपल्या झोपेमध्ये अडथळा येतो आणि सकाळी लवकर जाग येत नाही.
रूममधील तापमान : जर तुम्हाला एसी रूममध्ये झोपायची सवय असेल, तर खोलीचे तापमान राखणे जास्त गरजेचे आहे. अशा स्थितीत बेडरूमचे तापमान 20 ते 22 अंशांच्या आसपास असावे.
अलार्म दूर ठेवा : अनेकजण सकाळी लवकर उठण्यासाठी अलार्म लावतात. मात्र सकाळी अलार्म वाजला की ते बंद करतात आणि पुन्हा झोपतात. त्यामुळे तुमचे घड्याळ तुमच्यापासून दूर जे घेण्यासाठी तुम्हाला उठावे लागेल.
रात्री हलके अन्न घ्या : रात्री जड अन्न घेणे टाळा. त्याऐवजी खिचडी आणि तत्सम हलके जेवण घेणे सुरू करा. रात्रीचे हलके जेवण पोट हलके ठेवते त्यामुळे सकाळी उठण्यात कोणतीही अडचण येत नाही.
रात्री चहा, कॉफीपासून दूर राहा : रात्रीच्या जेवणानंतरही अनेकांना चहा किंवा कॉफी प्यायला आवडते. तुम्हाला चांगली झोप हवी असेल आणि सकाळी लवकर उठायचे असेल तर रात्रीच्या वेळी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय बंद करा.