चक्रता : पर्यटक मसुरीला गर्दी करत असताना तुम्ही उत्तराखंडमधील चक्रता या उंच आणि ऑफबीट पर्यटन स्थळाला भेट देऊ शकता. येथे तुम्ही फिरणे, ट्रॅकिंग आणि आराम तुम्हाला हवे ते करू शकता. समुद्रसपाटीपासून 7000-7250 फूट उंचीवर असलेल्या या ठिकाणाला तुम्ही एकदा नक्की भेट द्यायला हवी.
कोकरनाग : जम्मू आणि काश्मीरची ओळख असलेले श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम हे ठिकाणे तुम्हाला माहिती असतील. परंतु पहलगामपासून अवघ्या 60 किमी अंतरावर असलेले कोकरनाग या हिल स्टेशनला तुम्ही नक्की भेट द्यायला हवी. कोकरनागमध्ये काश्मीरमधील सर्वात मोठी बाग आहे आणि आशियातील सर्वात मोठी मत्स्यपालनही आहे. या ठिकाणी तुम्हाला हिरव्या दऱ्या आणि फुललेल्या फुलांच्या सुगंधाने जगाचा विसर पडेल.
मेचुका : समुद्रसपाटी पासून 6,000 फूट उंचीवर असलेल्या मेचुकाला अरुणाचल प्रदेशची निषिद्ध व्हॅली म्हणूनही ओळखले जाते. हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध आहे. येथे तुम्हाला मंत्रमुग्ध करणारी लँडस्केप, विदेशी जमाती, नैसर्गिक सुंदर तलाव, बर्फाच्छादित पर्वत आणि सियोम नदी पाहता येईल.
पेलिंग : सिक्कीममधील हे ठिकाण निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. सुट्टी एंजॉय करण्यासाठी हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. तुम्ही येथे तुम्ही मठांना भेट देऊ शकता, माउंटन बाइकिंग करू शकता, रॉक क्लाइंबिंग किंवा ट्रेकिंग करू शकता. निसर्ग आणि साहस प्रेमींसाठी हे सुट्टीचे योग्य ठिकाण आहे.
लांबसिंगी टेकड्या : आंध्र प्रदेशचे काश्मीर म्हणून ओळखले जाणारे लांबसिंगी येथे देखील तुम्ही भेट देऊ शकता. हिवाळ्यात बर्फवृष्टी होणारे हे दक्षिण भारतातील एकमेव ठिकाण आहे. चहा आणि कॉफीच्या मळ्यांसह हे ठिकाण सफरचंद आणि स्ट्रॉबेरीच्या छोट्या फार्मसाठी देखील प्रसिद्ध आहे.