भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी दरवर्षी देशात शिक्षकदिन साजरा केला जातो.
बोट धरून चालायला शिकवलंत तुम्ही, पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवलं तुम्ही… तुमच्यामुळे आज आम्ही आहोत या ठिकाणी, शिक्षकदिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आहोत ऋणी...
गुरूचं महत्त्व कधी होत नाही कमी, जरी तुम्ही कितीही मिळवली किर्ती… तसं तर ज्ञान इंटरनेटवरही मिळतं, पण योग्य अयोग्याची जाण दिली तुम्ही..
शिक्षक हे मेणबत्तीप्रमाणे असतात जे स्वतः जळून विद्यार्थ्यांचं आयुष्य प्रकाशमान करतात या जगातील प्रत्येक शिक्षकाला शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥ शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
जगण्याची कला शिकवतात शिक्षक, ज्ञानाची किंमत सांगतात शिक्षक… फक्त पुस्तक असून नाही काही फायदा, जर शिक्षकांनी मेहनतीने शिकवलं नसतं...