advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Taro Root Benefits : अळूच्या कंदाचा आहारात करा समावेश, ब्लडप्रेशर आणि शुगर लेव्हलही ठेवते नियंत्रित

Taro Root Benefits : अळूच्या कंदाचा आहारात करा समावेश, ब्लडप्रेशर आणि शुगर लेव्हलही ठेवते नियंत्रित

अनेकांना अळूचे कंद म्हणजेच अरबी खायला आवडते. ही अगदी बाजारात सहज उपलब्ध असते. याची चव इतर भाज्यांपेक्षा थोडी वेगळी असते. अरबी खाल्ल्याने आरोग्यासाठी खूप फायदे होतात. हे अळूचे कंद म्हणजेच अरबी पोटाच्या आणि वातांच्या समस्येवर हे खूप फायदेशीर आहे. पोटाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी अरबीमध्ये ओवादेखील टाकला जातो. त्यामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो. याचे सेवन केल्याने शरीराला पौष्टिक घटक मिळतात. या अरबीचे आणखीही खूप फायदे आहेत. ते जाणून घेऊया..

01
हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका कमी होईल : अरबीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे सी, ई असतात. याचा आहारात समावेश करून तुम्ही हृदयविकार आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी करू शकता. अरबीमध्ये असलेल्या भरपूर फायबरमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. यामध्ये पोटॅशियमदेखील असते, जे तणाव कमी करण्यास आणि हृदय गती नियंत्रित करण्यास मदत करते.

02
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते : अरबीमध्ये भरपूर स्टार्च असते आणि त्यात दोन प्रकारचे कार्बोहायड्रेट्स असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात. अरबी खाल्याने कार्बोहायड्रेट्सचे पचन आणि शोषण कमी होते आणि जेवणानंतर लगेचच रक्तातील साखरेची वाढ रोखते. अरबी खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे खाल्ल्यानंतर साखरेची अचानक वाढ टाळता येते.

03
वजन कमी करण्यात प्रभावी : अरबी वजन कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे. हे खाल्ल्याने तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते, ज्यामुळे दिवसभरातील कॅलरी कमी होण्यास मदत होते. अरबीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते, त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आहारात अरबीचा समावेश करा.

04
पोटाशी संबंधित समस्या दूर : अरबीमध्ये भरपूर फायबर आढळते. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. यासोबतच गॅस, बद्धकोष्ठता आणि जुलाबाची समस्याही दूर होते. (Photo Credit : healthline.com)

05
प्रतिकारशक्ती वाढवते : पौष्टिकतेने भरपूर असलेल्या अरबीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्तीदेखील मजबूत होईल. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. (Photo Credit : theindusparent.com)

06
दृष्टी वाढेल : अरबी खाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी सारख्या घटकांसह अँटिऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे डोळ्यांची दृष्टी वाढवण्यास मदत करतात. हे अँटिऑक्सिडंट आपल्या डोळ्यांच्या पेशींच्या वाढीचा वेग कमी करतात. ते आपल्याला मॅक्युलर डिजेनेरेशन (रेटिनाला नुकसान) आणि मोतीबिंदू होण्यापासून प्रतिबंधित करतात. (Photo Credit : delishably.com)

  • FIRST PUBLISHED :
  • हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका कमी होईल : अरबीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे सी, ई असतात. याचा आहारात समावेश करून तुम्ही हृदयविकार आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी करू शकता. अरबीमध्ये असलेल्या भरपूर फायबरमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. यामध्ये पोटॅशियमदेखील असते, जे तणाव कमी करण्यास आणि हृदय गती नियंत्रित करण्यास मदत करते.

    MORE
    GALLERIES