पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक असते. आपले बहुतांश शरीर पाण्याने बनलेले आहे. त्यामुळे लोक दिवसभरात पाणी पित राहतात. मात्र साठवलेले पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित असते का?
एबीपी माझा हिंदीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बरेचदा लोक रात्रभर पाणी साठवून ठेवतात आणि सकाळपर्यंत पाणी पितात. मात्र तुम्ही कधी त्याच्या चवीकडे लक्ष दिले आहे का? साठलेल्या पाण्याच्या चवीत थोडा बदल झालेला जाणवतो.
अभ्यासात असे समोर आले आहे की, 12 तास किंवा त्याहून अधिक वेळ पाणी ठेवल्यानंतर त्यात आण्विक बदल होऊ लागतात. हवेतील कार्बन डायऑक्साइड त्यात मिसळू लागतो. यामुळे पीएच मूल्य कमी होते.
त्याचबरोबर उघडे ठेवलेले पाणी पिणे सुरक्षित मानले जात नाही. उघड्या ठेवलेल्या पाण्यात बॅक्टेरिया वाढू लागतात. आपण एक घोट पाणी प्यायलो की, लगेच काचेच्या काठावर बसलेले बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतात.
साठलेले पाणी किती सुरक्षित आणि किती नाही याची पुष्टी करता येईल, असे कोणतेही संशोधन आतापर्यंत समोर आलेले नाही. लोकांनी साठवलेले पाणी पिणे टाळावे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण हे आरोग्यास गंभीरपणे हानी पोहोचवू शकते.