26 ऑगस्ट : आपल्याकडे एखादी फाटकी नोट आली की मोठा मनस्ताप होतो. फाटलेली नोट आली की कोणी घेत नाही मग आपण तिला असंच आपल्याकडे ठेवतो. पण बऱ्याच लोकांना फाटक्या नोटंचं काय करायचं याबद्द्ल माहित नाही आहे. चला तर मग जाणून घेऊयात की फाटक्या नोटेचं करायचं काय ?
1)फाटक्या नोटांना बदलता येते : हो काही वेळेस नोट इतकी फाटते की बदलता नाही येत. भारतीय रिझर्व बँकेच्या नियमानुसार, पूर्णपणे जळालेल्या आणि पुर्णपणे फाटलेल्या नोटेला बदलले जाता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या नोटा आरबीआयच्या इश्यू ऑफिसमध्येच जाऊ शकतात.
2)बँकेत फाटलेली नोट बदला - आरबीआयच्या नियमानुसार, प्रत्येक बँकेला जुन्या, फाटलेल्या किंवा चुगरळलेल्या नोटा स्वीकाराव्या लागतील. त्यामुळे आपण सहजपणे जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन आपली नोट बदलू शकता. यासाठी कोणताही शुल्क लागत नाही.
3)तुम्ही बिल करू शकता - बिल किंवा कर भरण्यासाठी तुम्ही फाटक्या नोटेचा वापक करू शकता. किंवा अशा प्रकारच्या नोटा बँक खात्यात भरून तुम्ही तुमच्या खात्यातली रक्कम वाढवू शकता. रिझर्व बँकेच्या नियमानुसार, एकदा का या फाटक्या नोटा बँकेच जमा झाल्या तर त्या नोटा कुठेही वापरता येणार नाही आणि त्या कोणाला दुसऱ्यालाही देऊ शकत नाही. केंद्रीय बॅंका या नोटांऐवजी नवीन नोट्स जारी करणार.
(4) असे देखील करा - कोणत्याही 5 नोटा तुम्ही अशा बँकेला देऊ शकता ज्या बँकेमध्ये मुद्रा तिजोरी नाही आहे. याबदल्यात बँक तुम्हाला एक पावती देईल. पुढच्या 30 दिवसांमध्ये फाटलेल्या नोटेऐवजी नवी नोट दिली जाईल. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, खूप जास्त फाटलेल्या आणि चुरगळलेल्या स्थितीत नोटा बदलल्या जात नाहीत. त्यावेळी आरबीआयच्या ईश्यू ऑफिसमध्येच जावे लागेल.