तुमचा जोडीदार तुमच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवत असेल आणि त्याला तुमचा सहवास आवडत असेल तर तो तुमच्यासोबत लग्न करू शकतो असे समजू शकता.
तुमची दैनंदिन दिनचर्या आणि तुमचा दिवस कसा गेला हे जाणून घ्यायला त्याला आवडत असेल आणि तो न चुकता ते विचारत असेल तर त्याला तुमच्यात रस आहे असे समजू शकता.
तणात असेल, दु:ख असेल किंवा आनंद असेल तो सर्वात आधी तुमच्यासोबत शेअर करावा असे त्याला वाटते. असे केल्याने छान त्याला वाटते. तुमचा सहवासात राहण्यासाठी तो सतत प्रयत्न करतो.
त्याच्या फ्यूचर प्लॅनमध्ये तुमच्यासाठी कायम जागा असते. ते वेळोवेळी याविषयी तुमच्याशी चर्चा देखील करतात. त्यांच्या आयुष्यात तुम्ही असण्याची ते सतत कल्पणा करत राहतात.
त्याचे फ्रेन्ड सर्कलला तुम्ही माहीत असता आणि त्यांच्याशी तुमची चांगली बॉन्डिंग असते. म्हणजेच तो त्याच्या आयुष्यात तुम्हाला स्थान देत असतो.
त्याने तुमची ओळख त्याच्या घरच्यांशी करून दिली आणि तुमच्याविषयी तो सर्वांसमोर मनमोकळेपणाने बोलतो असे असेल तर याचा अर्थ त्याने तुम्हाला त्याच्या आयुष्यात स्थान दिले आहे.
तो कुठेही तुमच्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे लपवत नाही. याउलट तो आधीच सर्वांना सांगतो की तो त्याच्या नात्याविषयी कमिटेड आहे.
तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी निगडित कोणतीही गोष्ट असो तो त्यात रुची दाखवतो आणि हे पण त्याचेच कुटुंब आहे असा तो विचार करतो.
तुमच्यापासून दूर जाण्याची आणि तुम्हाला दूर जाऊ देण्याची त्याची अजिबात इच्छा नसते. त्याला कायम तुम्ही जवळ हवे असता. याबाबत त्याने वारंवार बोलून देखील दाखवले असते.