गरोदरपणात स्त्रियांनी जास्त काळजी घेण्याची गरज असते. त्यासाठी महिलांनी दररोज 7 ते 9 तास झोप घ्यावी. नियमितपणे व्यायाम करावा. डीहायड्रेशनमुळे होणारी अकाली प्रसूती टाळण्यासाठी दररोज किमान आठ ग्लास द्रव-पाणी प्यावे.
स्त्रियांनी त्यांच्या खाण्यापिण्याकडेही तितकेच लक्ष देणे आवश्यक असते. लोह, कॅल्शियम आणि फोलेट समृद्ध असलेले निरोगी अन्न खावे. तसेच गर्भधारणेदरम्यान धूम्रपान, मद्यपान या गोष्टी करणे टाळावे. आता जणूं घेऊया तुम्ही काय करणे टाळले पाहिजे.
जड वस्तू उचलणे : एबीपी माझ्यामध्ये याविषयी सविस्तर वृत्त दिले आहे. गरोदरपणात महिलांनी फर्निचर किंवा इतर जड वस्तू हलवणे टाळावे. यामुळे त्यांच्या पाठीवर ताण येतो आणि दुखापत होण्याचा धोकाही वाढतो.
जास्त वेळ उभे राहणे : गरोदरपणात मॉर्निंग सिकनेसची समस्या असल्यास बराच वेळ उभे राहावे लागेल अशी कामं करू नका. कारण यामुळे पायांवर दाब पडू शकतो आणि सूज येण्यासोबतच पाठदुखीची समस्याही होऊ शकते. म्हणून स्वयंपाक करतानाही मध्ये मध्ये थोडा ब्रेक घ्या.
जास्त वाकणे : जास्त वेळ खाली वाकून केली जाणारी कामं जसे की मॉपिंग, कपडे धुणे, फरशी साफ करणे हे टाळावे. या काळात शरीराच्या गुरुत्वाकर्षणाच्या मध्यभागी बदल होऊ शकतो आणि मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
स्टूल किंवा शिडीवर चढणे : गर्भधारणेदरम्यान स्टूल किंवा पायऱ्या चढणे टाळा. कारण यामुळे बाळाला हानी पोहोचू शकते. अयोग्य संतुलनामुळे मुदतपूर्व प्रसूती किंवा प्लेसेंटल अकाली बिघाड होऊ शकतो.
रासायनिक उत्पादने किंवा कीटकनाशकांनी साफसफाई करणे : अनेक अभ्यासांनुसार, कीटकनाशकांमध्ये पाइपरोनिल बुटॉक्साइड हे रसायन आढळते, जे जन्मापूर्वी गर्भाच्या संपर्कात आल्यास बाळाच्या मेंदूच्या विकासावर परिणाम करू शकतो.