Peanut Or Almond Butter : पीनट बटर की आल्मन्ड बटर, कोणतं बटर आरोग्यासाठी जास्त फायदेशीर
आपण नाश्त्यामध्ये ब्रेडसोबत अनेकदा बटर खातो. पीनट, आल्मन्ड आणि इतर ड्राय फ्रूट्सपासून बनलेले बटर वापरले जाते. मात्र पीनट आणि आल्मन्ड बटरपैकी कोणते बटर जास्त आरोग्यदायी असते.
पीनट आणि आल्मन्ड बटर या दोन्हींमध्ये किमतीसोबत आणखीही काही फरक आहे. आज आपण या दोन्हींपैकी कोणते बटर आपल्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे. हे जाणून घेणार आहोत.
2/ 8
पीनट बटर स्वस्त आणि प्रोटीनची संख्या सर्वाधिक असणारे बटर आहे. यामध्ये कॅल्शियमदेखील स्ट. तुम्हाला शेंगदाण्याची अलर्जी नसेल तर पीनट बटर तुमच्यासाठी स्वस्त आणि खूप फायदेशीर पर्याय आहे.
3/ 8
आल्मन्ड बटरमध्ये हृदय-निरोगी मोनोअनसॅच्युरेटेड फॅट, प्रोटीन फायबर असते. हे जेवणादरम्यान भूक कमी करण्यास मदत करू शकते. लोक याचाही मोठ्या प्रमाणावर वापर करतात.
4/ 8
कॅलरी : पीनट आणि आल्मन्ड बटरमधील कॅलरी जवळजवळ सारख्याच असतात. दोन चमचे पीनट किंवा बदाम बटरमध्ये सुमारे 200 कॅलरीज असतात. त्यामुळे तुम्ही वजन कमी करत असाल तर जपून याचा वापर करावा.
5/ 8
हेल्दी फॅट : बदाम बटर पीनट बटरपेक्षा चांगले मानले जाते. या दोन्हीमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आढळते, जे हृदयविकारापासून ते रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. बदाम बटरमध्ये पीनट बटरपेक्षा सुमारे 25 टक्के अधिक मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते.
6/ 8
व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सच्या बाबतीतही बदाम बटर पीनट बटरपेक्षा चांगले आहे. त्यात तीनपट जास्त व्हिटॅमिन ई, दुप्पट लोह आणि सात पट जास्त कॅल्शियम असते. पीनट बटरमध्ये हे असते. मात्र बदाम बटरच्या तुलनेत ते खूपच कमी आहे.
7/ 8
फायबर : फायबर वजन नियंत्रित ठेवण्यात, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. पीनट बटरच्या तुलनेत बदाम बटरमध्ये जास्त फायबर असते. दोन चमचे बदाम बटरमध्ये सुमारे 3.3 ग्रॅम फायबर असते, तर 2 चमचे पीनट बटरमध्ये फक्त 1.6 ग्रॅम फायबर असते.
8/ 8
हरजिंदगीने दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही आरोग्यासाठी खूप चांगले असतात. परंतु बऱ्याच बाबतीत बदाम बटर पीनट बटरपेक्षा काहीसे चांगले आहे. त्यामुळे आता तुम्हीही पीनट बटरऐवजी बदाम बटरला प्राधान्य द्या आणि स्वत:ला अधिक निरोगी बनवा.