मीठ वास्तूनुसार मीठाचा संबंध शनिशी आहे. त्यामुळे ते कधीही इतरांकडून फुकटात घेऊ नये. तशीच वेळ आली तर मीठाबदली दुसरी वस्तू द्या. मिठाचा फुकट वापर केल्याने जीवनात आजार आणि कर्जाचा त्रासही वाढतो.
सुई फुकटात सुई घेतल्यास जीवनात नकारात्मकता वाढू लागते आणि घरातील लोकांमधील प्रेमसंबंध बिघडतात. सुईमुळे वैवाहिक जीवनावर परिणाम होण्यासोबतच आर्थिक नुकसान देखील होतं
रुमाल इतरांकडून मागून रुमाल वापरू नका आणि रुमाल कोणालाही देऊ नका. फुकटात रुमाल नेला आणि वापरला तर दुरावा निर्माण होतो असं म्हणतात. यामुळे लोकांमधील संबंध बिघडू लागतात
लोह आणि तेल या दोन्ही गोष्टींचा संबंध शनिदेवाशी आहे. लोह किंवा तेलाचा फुकट वापर करणं जीवनात प्रतिकूल परिणामांना प्रोत्साहन देतो. दान म्हणून घेतलेले लोखंड घरात दारिद्र आणते. तसेच तेल मागून घेतले तर ते व्यक्तीला आर्थिकरित्या कमकूवत बनवते