28 सप्टेंबर ड्रिंक बिअर डे मानला जातो. बिअर डे निमित्त आम्ही बियर पिण्याचे काही फायदे सांगणार आहोत. E Times ने दिलेल्या माहितीनुसार, बिअर पिण्याचे काही फायदे आहेत. मात्र याचा अर्थ असा नाही बिअर तुम्ही जास्त प्रमाणात पिऊ शकता.
एका संशोधनात असे आढळून आले आहे की उन्हाळ्याच्या हंगामात रात्रीच्या जेवणासोबत बिअर पिणे तुमच्या आतड्यातील चांगल्या आणि निरोगी बॅक्टेरियासाठी फायदेशीर आहे.
एका दिवसात एक किंवा दोन कॅन या प्रमाणात बिअर पिणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. प्रमाणात बियर प्यायल्याने तुमचे शरीर आणि मेंदू दोन्ही शांत आणि आनंदी होते.
प्रमाणात बिअर पिणे तुमच्यासाठी चांगले आहे. अनेक अभ्यासांमध्ये सांगितले गेले आहे की, माध्यम प्रमाणात मद्यपान करणारे लोक इतरांपेक्षा जास्त काळ आणि चांगले आयुष्य जगतात.
बिअर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल सुधारू शकते. माफक प्रमाणात बिअर प्यायल्याने तुमचे एचडीएल/एलडीएल कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहू शकते.
संशोधनानुसार बिअरमध्ये असे काही घटक असतात जे मधुमेहाचा धोका कमी करण्याचे काम करतात. इतकेच नाही तर उच्च रक्तदाब टाळण्यासही मदत होते. मात्र व्यायाम आणि योग्य आहार एकाच वेळी घेतला तरच फायदा होतो.
फिल्टर न केलेली किंवा हलकी फिल्टर केलेली बिअर बर्यापैकी पौष्टिक असल्याचे दिसून येते. बिअरमध्ये ब जीवनसत्त्वे, फॉलिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते, जे हृदयविकाराचा झटका टाळण्यास मदत करते असे मानले जाते.
जर तुम्ही अशा एखाद्या जागी असाल जिथे तुम्हाला पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. तर स्थानिक बिअर स्थानिक बाटलीबंद पाण्यापेक्षाही सुरक्षित आहे.
जास्त बिअर प्यायल्याने तुमचे वजन वाढू शकते, पण त्यात वाइनपेक्षा कमी कॅलरीज असतात आणि त्यामुळे माफक प्रमाणात सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
बिअर संत्र्याचा रस किंवा दुधाइतकीच नैसर्गिक आहे. बिअरला प्रिजर्व्हेटिव्हची गरज नसते. कारण त्यात अल्कोहोल असते. बिअरमध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स कमी असतात. तर त्यात फॅट किंवा कोलेस्ट्रॉल नसते.