गाढवाचे दूध जगात सर्वात महाग आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये याला जास्त मागणी आहे. येथे गाढवाच्या एका लिटर दुधाची किंमत 160 डॉलरपर्यंत आहे. म्हणजेच येथे एक लिटर दूध सुमारे 13 हजार रुपयांना मिळते. भारतातील काही शहरांमध्ये त्याची किंमत 7 हजार रुपये प्रति लिटर आहे. हे अनेक आरोग्य फायद्यांसाठी फायदेशीर मानलं जातं.
नकाझावा दूध: आता तुम्ही विचारात पडला असाल की, हे कोणतं दूध आहे? नाकावाजा ही एखादी दुर्मिळ प्रजाती नसून हे एका जपानी कंपनीचं ब्रँड नाव आहे. ही कंपनी सुपर-प्रिमियम गायीचं दूध तयार करते. गायींचे दूध आठवड्यातून एकदाच दिलं जातं. सर्व पोषक घटक टिकवून ठेवण्यासाठी दूध 6 तासांच्या आत बाटलीबंद केलं जातं. यामध्ये सामान्य गाईच्या दुधापेक्षा 3 ते 4 पट अधिक मेलाटोनिन असतं. मेलाटोनिन हे एक हार्मोन आहे जे तणाव नियंत्रित करतं आणि चिंता कमी करतं. टोकियोमध्ये त्याची किंमत 40 डॉलर म्हणजेच सुमारे 3000 रुपये प्रति लिटर आहे.
उंटाचं दूध: उंटाचं दूध हे अनेक भटक्या लोकांच्या पारंपारिक आहाराचा अविभाज्य भाग आहे. उदाहरणार्थ, अरबस्तानात खजूर आणि उंटाचं दूध एकत्र करणं हा उपवास सोडण्याचा सर्वात सामान्य मार्ग आहे. उंटाच्या दुधाची चव गाईच्या दुधासारखीच असते, त्यामुळं त्याचाही वापर करता येतो. ऑस्ट्रेलियामध्ये उंटाच्या दुधाची किंमत 14.5 AUD प्रति लीटर आहे जी सुमारे 800 रुपये प्रति लीटर आहे. (फोटो: @tradeinvestqld)
म्हशीचं मलईदार दूध दक्षिण आशिया आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. इटली आणि इतर काही देश वगळता युनायटेड स्टेट्स किंवा युरोपमध्ये ते मोठ्या प्रमाणावर वापरलं जात नाही. भारतातही याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. भारतात त्याची किंमत 70-80 रुपये प्रति लिटर आहे. अमेरिकेत यासाठी अडीचशे रुपये खर्च करावे लागतील.
शेळीचे दूध लोकप्रियतेच्या बाबतीत गाईच्या दुधाला आव्हान देत आहे. मात्र चवीत मोठा फरक आहे. गाढव, उंट आणि म्हशीच्या दुधाची चव गाईच्या दुधासारखी असली तरी शेळीच्या दुधाची चव वेगळी असते. शेळीच्या दुधात किंचित जास्त प्रथिने, कोलेस्टेरॉल आणि चरबी आणि तत्सम जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. भारतात त्याची किंमत 100 रुपये प्रति लिटर आहे.
ओट मिल्क अद्याप बदाम किंवा सोया दुधाच्या लोकप्रियतेपर्यंत पोहोचलेले नाही, परंतु तुम्हाला ते जगभरातील कॉफी शॉपमध्ये मिळेल. या हलक्या गोड दुधाला क्रीमयुक्त पोत असतो. याचा अर्थ ते लट्टे, कॅपुचिनो आणि चहासाठी योग्य आहे. ते प्रति लीटर 8 डॉलर मध्ये उपलब्ध आहे.
बदामाच्या दुधाची यूएस बाजारपेठ प्रतिवर्षी 1 बिलियन डॉलर पेक्षा जास्त पोहोचली आहे आणि ती आणखी दराने वाढण्याची अपेक्षा आहे. 6 डॉलर प्रति गॅलन दरात हे दूध उपलब्ध असून गाईच्या दुधाला परवडणारा पर्याय आहे.