पावसाळ्यात जागोजागी पाणी साचलेलं असतं. अशा पाण्यात वापरल्यास आपल्याला अनेक त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे यापासून वाचण्याचे उपाय आपल्याला माहित असणं आवश्यक आहे.
पावसाळ्यात उत्तम आरोग्यासाठी आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणंही आवश्यक आहे. म्हणून शिळे अन्न, जंक फूड खाणे टाळा. तसेच जेवण गरम गरम खावे आणि भाज्या, फळे व्यवस्थित धुऊन खावे.
पावसाळ्यात शारीरिक आरोग्यही जपावे लागते. कारण अनेकदा आपण पावसात भिजतो, साचलेल्या पाण्यातून, चिखलातून आपल्याला चालावे लागते. यामुळे आपल्या त्वचेवर परिणाम होण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात तुम्ही भिजून आल्यास किंवा साचलेल्या पाण्यात, चिखल असलेल्या पावसातून प्रवास केल्यानंतर नेहमी घरी येऊन अंघोळ करावी. अंघोळीसाठी गरम पाणी वापरावे. तसेच पाय व्यवस्थित कोरडे करावे. जेणेकरून चिखल्या होणार नाहीत.
साचलेल्या पाण्यामुळे अनेक साथीचे आजार पसरू शकतात. जसे की, डायरिया, गॅस्ट्रो, कॉलरा, टायफॉइड, कावीळ. तसेच साचलेले पाणी जर खूप दूषित झाले तर त्या पाण्यातून चालल्याने लेप्टोस्पायरोसिस हा आजार पसरतो.
साचलेल्या पाण्यामुळे होणाऱ्या आजारांमध्ये सरावात प्रसिद्ध आणि सर्वात जास्त प्रमाणात होणार आजार म्हणजे डेंग्यू. ठिकठिकाणी पाणी साचल्याने त्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरिसा, स्वाईन फ्ल्यू हे आजार बळावतात.
पावसाळ्यात सूर्यप्रकाशाअभावी धुतलेले कपडे व्यवस्थित सुकत नाहीत, त्यामुळे बऱ्याचदा यामध्ये बुरशी होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे त्वचेला संसर्ग होण्याची भीती असते. तसेच जुलाब हादेखील दूषित पाण्यामुळे होणारा आजार आहे.
पावसाळ्यात कधी पाऊस, कधी कडक ऊन तर कधी थंडी अशा सतत बदलत्या वातावरणाचा परिणाम आरोग्यावर होतो. यामुळे सर्दी, खोकला, ताप असे त्रास संभवतात. म्हणूनच पावसाळ्यात साचलेल्या पाण्यापासून दूर राहावे आणि शक्य असल्यास पाणी साचू देऊ नये.