advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Mahatma Phule Jayanti 2023 : महात्मा फुलेंबद्दलच्या या 7 गोष्टी तुम्हाला माहिती नसतील!

Mahatma Phule Jayanti 2023 : महात्मा फुलेंबद्दलच्या या 7 गोष्टी तुम्हाला माहिती नसतील!

Mahatma Phule Jayanti 2023 : थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांची आज 11 एप्रिल रोजी जयंती आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही न ऐकलेल्या गोष्टी.

01
थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या वडिलांचं नाव गोविंदराव आणि आईचं नाव चिमणाबाई होतं. शेवटच्या पेशव्यांच्या काळात त्यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचं काम करीत होते. त्यामुळे गोर्‍हे हे त्यांचं मूळ आडनाव असलं तरी पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले.

02
कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी इथे आला. तिथे त्यांचं घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी इथे फुले आडनावाची बरीच कुटुंबं आहेत. जोतिराव केवळ नऊ महिन्यांचे होते तेव्हा त्यांच्या आईचं निधन झालं. त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाईशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला.

03
इ.स. 1842 ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.बहुजन समाजाचं अज्ञान, दारिद्र आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला.

04
इ.स. 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपवली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली.अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळपेठेत इ.स. 1852 मध्ये शाळा स्थापन केली.

05
जोतिरावांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केलं. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. 24 सप्टेंबर इ.स. 1873 रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.समाजातील विषमता नष्ट करणं आणि तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणं हे सत्यशोधक समाजाचं ध्येय होतं.

06
24 सप्टेंबर इ.स. 1873 रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरूवात केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचं नेतृत्व सावित्रीबाई यांनी केलं.

07
सावित्रीबाई यांच्याबरोबर 19 स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचं कार्य सुरू केलं. त्याचवेळी त्या कन्याशाळेच्या शिक्षिका म्हणूनही कार्य करत होत्या. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्या वेळी लेखन प्रकाशनाचं कार्य केलं. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची आणि सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरूवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली.

  • FIRST PUBLISHED :
  • थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या वडिलांचं नाव गोविंदराव आणि आईचं नाव चिमणाबाई होतं. शेवटच्या पेशव्यांच्या काळात त्यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचं काम करीत होते. त्यामुळे गोर्‍हे हे त्यांचं मूळ आडनाव असलं तरी पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले.

    MORE
    GALLERIES