घरगुती किंवा आजीबाईंचे अनेक नुसके असतात. ज्यांना आपण स्वयंपाक घरापासून ते आयुष्यात इतर गोष्टींसाठी फॉलो करतो. या अशा गोष्टी असतात ज्याबद्दल कधीकधी आपल्याला देखील फारशी माहिती नसते.
त्यापैकी एक गोष्ट म्हणजे तुप. हे बनवण्याची पद्धत तशी सगळ्यांना माहितीय. पण तुम्ही तुपामध्ये आणखी एक गोष्ट टाकलीत तर त्या तुपाला सुंदर सुगंध येतो शिवाय ज्यामुळे तुप चविष्ट होतं. ही गोष्ट आहे विड्याचं पान
ही जुनी रेसीपी आहे. ज्यामुळे काही लोक आजही तुपामध्ये विड्याचे पान टाकतात. पण आता हे का टाकलं जातं आणि त्याचे फायदे काय हे जाणून घेऊ.
विड्याच्या पानाची ओळख हे खायचं पान असं आहे. मग हे पान तुपात देखील टाकलं जातं, याबद्दल फार कमी लोकांना ठावूक असेल.
बरेच दिवस ठेवलेल्या दुधावरील सायीला जो वास येतो, तो वास हे पान टाकल्याने येत नाही. तसेच यामुळे तूप रवाळ आणि चवीला छान लागते, त्याला कोणताही वास राहत नाही.
त्यामुळे तुपाला एक वेगळा आणि रवाळ सुगंध येईल. जो खाण्यासाठी चांगला लागतो आणि याचा जादुई फरकामुळे तुप बनवताना लोक विड्याचं पान तुपात टाकतात.