पांढरा, हिरवा आय लायनर : तुमच्या डोळ्यांवर पांढर्या आणि हिरव्या रंगाच्या आय लायनर शेड्स वापरून तुम्ही कॅरी करू शकता असा सर्वात बेसिक लुक. फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही डोळ्यांभोवती हे आय लायनर लावू शकता. (Photo Credit : Shutterstock)
तिरंगी आय शॅडो : केशरी, हिरवा आणि पांढऱ्या रंगाने तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या पापण्यांवर तिरंगा बनवू शकता. तुम्ही नेहमीच्या काळ्या रंगाऐवजी इलेक्ट्रिक ब्लू मस्कराचा डॅश वापरून लूक पूर्ण करू शकता. (Photo Credit : Shutterstock)
साधे डोळे आणि बोल्ड ओठ : तुम्ही तुमचा चेहरा कॅनव्हास म्हणून वापरू शकता आणि वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळे रंग लावू शकता. डोळ्यांच्या मेकअपमध्ये हिरव्या आणि निळ्या रंगाची छटा ठेवू शकता आणि ठळक केशरी लिपस्टिकसह पांढरे काजळ लावू शकता. (Photo Credit : Shutterstock)
तिरंगी नेल आर्ट : तुमच्या मेकअप कम्प्लिट करण्यासाठी तुम्ही सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेले नेल आर्ट वापरू शकता. वेगवेगळ्या नखांवर केशरी, हिरवा आणि पांढरी नेल पेंट वापरून तुमची नखे रंगवा. (Photo Credit : rougepouts.com)
चेहऱ्यावर तीन रंगांचे पेंट : डोळ्यांच्या या मेकअपसह तुम्ही चेहऱ्यावर म्हणजेच गालावर किंवा कपाळावर तीन रंगांचे झेंड्याप्रमाणे पेंटिंग करून शकता. (Photo Credit : Shutterstock)
बांगड्या : चेहऱ्याच्या मेकपसह तुम्ही हातात तीन रंगांच्या बांगड्या घालू शकता. सलवार सुटसोबत या बांगड्यांचा लूक खूप छान दिसतो. (Photo Credit : twitter)
ड्रेस : या स्वातंत्र्यदिनाला जर तुम्हाला ट्रेडिशनल टाईप भारतीय पेहराव करायचा असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाचे सलवार सूट घालू शकता. यासोबत तुम्ही तिरंगी किंवा मल्टिकलर्ड ओढणी कॅरी करू शकता. (Photo Credit : anjali_queen_star instagram)