advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / स्कीन केअरसाठी डाळिंबाची साल आहे जबरदस्त उपाय! असा वापर केल्यास दिसेल परिणाम

स्कीन केअरसाठी डाळिंबाची साल आहे जबरदस्त उपाय! असा वापर केल्यास दिसेल परिणाम

निरोगी राहण्यासाठी अलिकडे अनेकजण फळांचे सेवन करतात. विविध गुणांनी समृद्ध डाळिंब हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेच्या सौंदर्यासाठीही गुणकारी आहे. डाळिंबाच्या सालीमध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात. यासोबतच डाळिंबाच्या सालीमध्ये असलेले लोह, जीवनसत्त्वे आणि खनिजे त्वचेला पूर्ण पोषण देऊ शकतात. यासाठी त्वचेवर डाळिंबाच्या सालीचा वापर करून त्वचेशी संबंधित अनेक समस्या कमी करता येतात. जाणून घेऊया डाळिंबाच्या सालींचा त्वचेवर वापर आणि त्याचे काही अनोखे फायदे.

01
टॅनिंग - उन्हाळ्यात त्वचेवर डाळिंबाच्या सालींचा वापर केल्याने सूर्यप्रकाशाच्या हानिकारक किरणांपासून बचाव होतो. उन्हात जाण्यापूर्वी डाळिंबाच्या सालीची पावडर कोणत्याही क्रीम, लोशन किंवा इसेन्शल तेलात मिसळून लावल्याने केवळ सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण मिळत नाही तर त्वचेला टॅनिंग आणि सनबर्नपासूनही रोखता येते. (Image/Canva)

02
त्वचा मॉइश्चराइज राहील - उन्हाळ्यात डाळिंबाची साल त्वचेसाठी सर्वोत्तम मॉइश्चरायझर ठरू शकते. डाळिंबाच्या सालीमध्ये असलेले इलॅजिक अॅसिड त्वचेची पीएच पातळी संतुलित करून मॉइश्चरायझर लॉक करण्याचे काम करते. यासाठी डाळिंबाची साले उन्हात वाळवून बारीक करून पावडर बनवावी. आता 2 चमचे पावडरमध्ये थोडेसं गुलाबजल मिसळून पेस्ट तयार करा आणि त्वचेवर लावा. 10 मिनिटांनंतर त्वचा स्वच्छ पाण्याने धुवा. (Image/Canva)

03
त्वचेच्या समस्येपासून मुक्ती मिळवा : अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट घटक असलेला डाळिंबाच्या सालीचा फेस पॅक त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी आणि मुरुम आणि डागांपासून मुक्त होण्यासाठी देखील प्रभावी आहे. यासाठी डाळिंबाच्या सालीपासून बनवलेल्या पावडरमध्ये आवश्यक तेल, दही आणि गुलाबजल मिसळून चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

04
उघडे छिद्र बंद होतील : उन्हाळ्यात धूळ, घाण आणि घामामुळे त्वचेची छिद्रे उघडू लागतात. अशा परिस्थितीत डाळिंबाच्या सालींचा फेस पॅक त्वचेची छिद्रे कमी करण्यास मदत करतो. यासाठी डाळिंबाच्या सालीपासून बनवलेल्या पावडरमध्ये दही, गुलाबजल आणि एसेन्शियल ऑईल मिसळून पेस्ट बनवा. आता ते त्वचेवर लावा आणि कोरडं झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

05
वृद्धत्वाची लक्षणे दूर होतील: डाळिंबाची साल त्वचेतील कोलेजन कमी करून त्वचेच्या मृत पेशी दुरुस्त करण्याचं काम करते. त्यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा यांसारखी वृद्धत्वाची लक्षणंही कमी होतात. यासाठी डाळिंबाच्या सालीपासून बनवलेल्या पावडरमध्ये 2 चमचे गुलाबपाणी घालून चेहऱ्याला लावा आणि कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. (अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित आहे. मराठी न्यूज 18 याची हमी देत नाही. हे लागू करण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

  • FIRST PUBLISHED :
  • टॅनिंग - उन्हाळ्यात त्वचेवर डाळिंबाच्या सालींचा वापर केल्याने सूर्यप्रकाशाच्या हानिकारक किरणांपासून बचाव होतो. उन्हात जाण्यापूर्वी डाळिंबाच्या सालीची पावडर कोणत्याही क्रीम, लोशन किंवा इसेन्शल तेलात मिसळून लावल्याने केवळ सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण मिळत नाही तर त्वचेला टॅनिंग आणि सनबर्नपासूनही रोखता येते. (Image/Canva)

    MORE
    GALLERIES