कपड्यांशिवाय झोपण्याचे फायदे बरेच आहेत. त्वचेच्या आरोग्यासाठीही कपड्यांशिवाय झोपणं चांगलं मानलं जातं. पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी कपड्यांशिवाय झोपणं फायदेशीर आहे.
ज्यांच्या शरीरावर जास्त प्रमाणात घाम येतो. रात्री कपडे काढून झोपल्यामुळे इन्फेक्शनचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो.
कपड्याशिवाय झोपल्यामुळे आपल्या शरीराचं तापमान संतुलित होतं. कधीकधी शरीराचं तापमान वाढतं. अशा वेळेस झोपताना कपडे काढून झोपल्याने तापमान संतुलित होतं.
कपडे न घालता झोपल्यामुळे त्वचेसंबंधित आजार आपोआप बरे होतात. कपडे काढून झोपल्यामुळे शरीराला चांगली हवा मिळते आणि त्यामुळे एखादं इन्फेक्शन झालं असेल तर ते कमी होतं.
कपड्यांशिवाय झोपल्यामुळे रक्ताभिसरण चांगलं होतं. रक्तदाबाचा त्रास होत असेल तर, रक्तदाब नियंत्रणात येतं. शरीरामध्ये ऑक्सिटोसिन काढतं. ज्यामुळे आपला मानसिक ताण कमी होतो.
कपडे न घालता झोपल्यास आपल्याला नेहमीपेक्षा जास्त निवांत झोप लागते. शरीराचं तापमान थंड राहतं. तापमान नियंत्रणात राहिल्यामुळे मेंदू शांत होतो. झोपही चांगली येते.
कपड्यांशिवाय झोपल्यामुळे चांगली आणि गाढ झोप लागते. त्यामुळे आपली स्मरणशक्ती देखील सुधारते. गाठ झोपेमध्ये हार्मोन्स चांगल्या प्रकारे तयार होतात. जे आपल्या मेंदूच्या वाढीसाठी उपयोगी असतात आणि आपली स्मरणशक्ती वाढवतात.
कपड्यांशिवाय झोपल्यामुळे गाढ झोप लागते. स्ट्रेस कमी होतो. शरीरात कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन कमी होतं. शांत झोप लागल्यामुळे खाल्लेलं अन्न देखील चांगल्या प्रकारे पचतं आणि वजन नियंत्रणात येतं.
अनेक संशोधनांमधून दिसतं की, पुरुषांनी कपड्यांशिवाय झोपणं चांगलं. कारण टाइट अंडरवेअर वापरल्याने स्क्रोटमचं तापमान वाढतं. त्यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते.
स्लीप फाउंडेशनच्या मते, महिलांनाही नेकेड झोपण्याचा फायदा होतो. टाइट, सिंथेटिक अंडरवेअरमुळे कँडिडा संसर्ग महिलांच्या योनीमार्गाजवळ होऊ शकतो. त्यामुळे व्हजायनल इचिंग होऊ शकतं. रात्रीचा काही वेळ तरी मोकळं झोपल्याने हे यीस्ट इन्फेक्शन होत नाही.