या तैवानी मॉेडेलच्या बाबतीत मात्र जणू काही काळच थांबला असावा, असं वाटतं. या मॉडेलकडे पाहून तिचं वय काय असावं, असा प्रश्न विचारला, तर अनेकांचं उत्तर चुकतं. या तरुणीच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी जो वयाचा अंदाज मनात येतो, तो सपशेल चुकीचा असतो.
ही आहे प्रसिद्ध तैवानी मॉडेल ल्युएर सू. आपल्या सौंदर्यासाठी ती जगभर ओळखली जाते. तुम्हाला काय वाटतं, काय असावं या मॉडेलचं वय? 18, 20 की 22?
तुम्हाला असं तर वाटत नाही ना, की ही 20 ते 30 या वयोगटातली असावी? कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 30. बरोबर ना? अनेकांना असंच वाटतं. बहुतांश लोक सांगतात की ही 21 किंवा 22 वयाची असावी. पण काहीही झालं तरी तिशीच्या वरची नक्कीच वाटत नाही. तुम्हालाही असंच वाटत असेल, तर तुम्हीसुद्धा चुकीचं उत्तर देणाऱ्या 90 टक्क्यांपैकी आहात.
इंटेरियर डिझायनर आणि मॉडेल असणारी ल्युएर ही गेल्या काही दिवसांपासून युथफूलनेसचा आयकॉन बनली आहे. तिच्या चिरतरूण लुक्समुळे ती जगभर गाजत आहे. तिच्या तारुण्याचं रहस्य अनेकजण तिला विचारत असतात आणि ती याचं रहस्य शेअरही करते.
आपल्या तारुण्याचं रहस्य सांगताना तिनं काही बेसिक गोष्टी सांगितल्या आहे. भरपूर भाज्या खाणं, भरपूर पाणी पिणं आणि आपली त्वचा सतत मॉईश्चुराईज्ड ठेवणं हीच आपल्या तारुण्याची रहस्यं असल्याचं ती सांगते. मात्र रहस्य काही एवढंच नाही. अजूनही आहेत.
रोज सकाळी ब्लॅक कॉफी पिणं, आहारातून गोड पदार्थ बंद करणं, तेलकट पदार्थ न खाणं, प्रोटिन आणि फायबरयुक्त आहार घेणं, नियमित व्यायाम करणं हे तरुण राहण्यासाठी गरजेचं असल्याचं ती सांगते.
तर, आता मूळ प्रश्नाचं उत्तर. या तैवानी मॉ़डेलचं वय 30 पेक्षा जास्त आहे. 33 असेल असं तुम्हाला वाटतंय? की 35 असू शकेल. विचार करा. आणखी काही सेकंद विचार करून पाहा.
काहीजणांना ही विशीची मुलगी वाटेल, काहीजणांना तिशीची वाटेल. मात्र हिचं खरं वय आहे 44 वर्षं. होय. 44 वर्षं. प्रचंड मेहनत घेऊन तिनं आपलं तारुण्य टिकवून ठेवलं आहे.