मराठी नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. महाराष्ट्रात सर्वत्र चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो.
गुढीपाडवा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असल्याने हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या कोणत्याही नव्या गोष्टीला प्रारंभ करणे, खूप शुभ मानले जाते. Photo Credit : khushbu_creative_corner
खरंतर गुढीपाडवा भारतातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे असणारा एक प्रमुख सण आहे. दक्षिण भारतातील लोक या सणाला उगादी म्हणतात. Photo Credit : vitthal.rangoliarts_96
इतर वेगवेगळ्या ठिकाणी गुढी पाडवा संवत्सर पाडो, चेती, नवरेह अशा नावांनी ओळखला जातो. Photo Credit : swarsanchita_4350
गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. गुढीच्या सजावटी बरोबरच परिसरात रंगीबेरंगी रांगोळी काढली जाते. Photo Credit : rangolibyhrudaya
गुढीपाडव्याला सर्वत्र वातावरण चैतन्यमय राहते. गुढीला नैवेद्य दाखवण्यासाठी, त्याचबरोबर घरामध्ये सणसुदीचा आनंद साजरा करण्यासाठी, प्रत्येक घरात पंच पक्वान्नाबरोबरच गोडधोडही केले जाते. Photo Credit : khushbu_creative_corner
महाराष्ट्रात यामध्ये प्रामुख्याने पुरणपोळी आणि श्रीखंडाचा समावेश असतो. गुढी पाडव्याच्या दिवशी कोणतेही शुभकार्य आपण दिवसभरात कधीही करू शकतो. Photo Credit : ajrangolidesign
या दिवशी घर खरेदी करणे, वाहन खरेदी करणे, दागदागिने खरेदी करणे, यासाठी कोणताही विशेष मुहूर्त बघण्याची गरज नसते.Photo Credit : karbhari_ankita