श्रीमहालक्ष्मीच्या गळ्यात कोल्हापुरी ठुशी, …. रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी दत्तगुरूंच्या रूपात दिसतात मला ब्रम्हा, विष्णू आणि महेश,…. रावांचे नाव घेत करते गृहप्रवेश आर्शीवादाचे दान घेते तुम्हा सर्वांसमोर वाकून, … रावांचे नाव घेते नव्या घरात तुमच्या सर्वांचा मान राखून चांदीच्या वाटीत ठेवला बदामाचा शिरा, …. रावांचे नाव घेत सांगते तेच माझा खरा दागिना जमले सर्व नातेवाईक, लग्न लागले दारात,… रावांचे नाव घेते, मला आता येऊ द्या घरात