लसूण गुणधर्मांचा खजिना आहे आणि ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये कॅल्शियम, तांबे, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह आणि व्हिटॅमिन बी 1 सारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे.
लसणामुळे जेवणाची चव अनेक पटींनी वाढतेच, शिवाय रोगप्रतिकारशक्तीही वाढते आणि आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. आता लसणाचा वापर अनेक प्रकारच्या फास्ट फूडमध्येही केला जात आहे. मात्र काही लोकांनी याचे जास्त सेवन टाळणं आवश्यक आहे.
जास्त प्रमाणात लसूण खाल्ल्याने तुमचा रक्तदाब कमी होऊ शकतो. ज्या लोकांना आधीच कमी रक्तदाबाची समस्या आहे, त्यांनी लसणाचे जास्त प्रमाणात सेवन अजिबात करू नये.
लसणाच्या अतिसेवनामुळे तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या उद्भवू शकते. इतकंच नाही तर कधी कधी घामातून आणखी दुर्गंधी येऊ लागते. म्हणूनच ज्यांना आधीच तोंडातून जास्त दुर्गंधी येण्याची किंवा काही कारणाने घामाची समस्या आहे, त्यांनी लसूण जास्त खाऊ नये.
लसणात अॅसिड असते, त्यामुळे लसूण जास्त प्रमाणात खाल्ल्याने छातीत जळजळ होऊ शकते. ज्या लोकांना आधीच अॅसिडिटीची समस्या आहे, त्यांनी लसणाचे जास्त सेवन टाळावे.
जर तुमचे मेटॅबॉलिझम कमकुवत असेल किंवा त्यामध्ये काही समस्या असतील आणि त्यामुळे तुम्ही काहीही खाल्ल्याने सहज त्रास होत असेल. तर तुम्ही लसणाचे सेवन करू नये, यामुळे तुमची समस्या आणखी वाढू शकते.
जर काही समस्यांमुळे तुम्ही रक्त पातळ करणारी औषधं घेत असाल तर लसणाचे सेवन मर्यादित प्रमाणात करणं खूप आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या समस्या वाढू शकतात.