'मासे' म्हणजे मांसाहारप्रेमींचं सुख. तळलेले मासे, सुके मासे, माश्यांचं कालवण म्हणजे आहाहा! नुसता ताव...
मात्र तुम्ही कितीही मोठे खवय्ये असलात तरी त्यालाही एक मर्यादा असते. एक 16 इंचाची जम्बो फ्रिश फ्राय कबीराजी दिली, तर खाऊ शकाल? की पार्सल घरी घेऊन जाल?
कबीराजी म्हणजे आपण मासे तळतो तोच प्रकार. मात्र यात माश्यांना भरपूर पदार्थांचं आवरण असतं. फेटलेल्या अंड्यात बुडवून हे मासे तळले जातात. जे बाहेरून जाळीदार दिसतात
पश्चिम बंगालच्या विविध रेस्टॉरंट्समध्ये अतिशय कमाल कबीराजी मिळते. नाडिया जिल्ह्यात असलेल्या आकंता आपन रेस्टॉरंटमध्ये 16 इंच आकाराची कबीराजी आणि त्यासोबत एक तळलेला मासा मिळतो.
या डिशला तिथे प्रचंड मागणी आहे, मात्र एकटी व्यक्ती ती संपवू शकत नाही असा दावा केला जातो. विशेष म्हणजे यासाठी केवळ 250 रुपये मोजावे लागतात. तसेच येथील बिर्याणीही प्रसिद्ध आहे.
तुम्हीसुद्धा कधी पश्चिम बंगालमध्ये गेलात, तर या रेस्टॉरंटला भेट द्या आणि कबीराजीचा आस्वाद घ्या. तसेच आपण इंटरनेटच्या मदतीने घरीही कबीराजी बनवू शकता.