ओट्स : ओट्स सध्याच्या काळात हेल्दी फूड म्हणून प्रसिद्ध झाले आहे आणि लोक ते आवडीने खातातदेखील. मात्र याची शेल्फ लाइफ खूपच कमी आहे आणि ते फक्त 4-6 महिन्यांत एक्स्पायर होऊ शकते. त्यामुळे ओट्स प्रमाणात खरेदी करून घरात पडू देऊ नये.
पीठ : बर्याचदा पांढर्या पिठाचे शेल्फ लाईफ जास्त असते. परंतु पीठदेखील एका वर्षापेक्षा जास्त राहिले तर त्यामध्ये किडे किंवा पाकळ्या होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात तर पिठाचे शेल्फ लाईफ आणखी कमी होते.
फ्रोझन फूड : कॅन फूड किंवा फ्रोझन फूड तुम्ही घरी आणल्यानंतर ते एका वर्षाच्या आत संपवणे गरजेचे असते. त्याचबरोबर एकदा या पदार्थाचे सील फोडल्यानंतर तो जास्त दिवस पडून राहू देऊ नये.
पॅक तेल : सील न उघडलेले तेल योग्य स्थितीत साठवल्यास ते 2 वर्षांपर्यंत टिकू शकते. मात्र ते थंड ठिकाणी साठवले गेले पाहिजे. तेलाच्या पॅकचे सील उघडल्यानंतर ट्रे लवकरात लवकर वापरावे आणि त्याच्या वासात किंवा रंगात होणाऱ्या बदलांकडे लक्ष दिले पाहिजे.
एक्झॉटिक भाज्या : ब्रोकोली, मशरूम, ढोबळी मिरची, सेलेरी आणि लेट्यूस सारख्या एक्झॉटिक म्हणजेच विदेशी भाज्या शक्य तितक्या लवकर खाव्यात. त्यांना एका आठवड्यापेक्षा जास्त काळ साठवण्यासाठी त्या थंड आणि कोरड्या जागी ठेवा, तसेच या भाज्या कागदी पिशव्यांमध्येच साठवाव्यात. (Photo Credit : Indiascience.com)