Fast Food Brand Logo : अनेक फास्ट फूड ब्रँड्सचा लोगो लाल आणि पिवळ्या रंगाचाच का असतो?
आपल्याकडे फास्ट फूड खाणाऱ्यांची कमी नाही. फास्ट फूडमधील काही ब्रँड्स जितके त्यांच्या चवीसाठी प्रसिद्ध आहेत. तिक्तच त्यांच्या लोगोसाठी. काही खाद्य किअँपन्यांचे लोगो आपल्याला विशेष लक्षात राहतात, पण असे का? जाणून घेऊया.
KFC ते McDonald's पर्यंत आपल्या आवडत्या फूड डेस्टिनेशनची चव तितकीच आठवते जितकी आपल्याला त्यांचे लोगो आठवतात. परंतु जर तुम्ही थोडेसे लक्ष दिले तर तुमच्या लक्षात येईल की, प्रत्येकाच्या नावात आणि लोगोमध्ये एक गोष्ट समान आहे.
2/ 7
आता ही सामान गोष्ट कोणती तर, प्रत्येक ब्रँडचा लोगोमध्ये लाल आणि पिवळा रंग प्रकर्षाने आढळतो. या दोन रंगामागे एक वैज्ञानिक कारण आहे. आपली मानसिकता त्याच्याशी जोडलेली असते.
3/ 7
या रंगांच्या निवडीमागील मूळ कारण म्हणजे जेव्हा आपण हे दोन रंग एकत्र पाहतो तेव्हा आपल्याला अन्न हवेसे वाटते. म्हणूनच लोक भूक लागलेली नसतानाही अगदी आवडीने फास्ट फूड खातात.
4/ 7
लाल रंग : लाल रंगामुळे आपले अन्नाबद्दलचे प्रेम, खाण्याची इच्छा, आवड वाढते. एका शब्दात, लाल रंग आपली भूक वाढवतो आणि म्हणूनच खवय्ये लाल रंगाकडे आकर्षित होतात.
5/ 7
विज्ञानानुसार, लाल हा रंग आहे जो सक्रिय असण्याशी संबंधित आहे आणि आपल्या हृदयाचे ठोके देखील वाढवू शकतो. हा रंग बघून तुमच्या हृदयाची गतीही वाढते आणि तुम्हाला भूक लागते.
6/ 7
पिवळा रंग : पिवळा रंग मैत्रीचे प्रतीक आहे. आनंद चमकदार पिवळ्या रंगात व्यक्त केला जातो. त्यामुळे रेस्टॉरंटच्या नावात आणि लोगोमध्ये पिवळा रंग वापरला जातो.
7/ 7
इतकंच नाही तर उजेडातही पिवळा रंग सहज दिसतो. म्हणूनच पिवळ्या लोगोचा वापर केल्याने लोकांचे दुरूनही सहज लक्ष जाते. अभ्यासानुसार, बऱ्याचदा लोक केवळ उत्पादनाच्या रंगावर अवलंबून अन्न ऑर्डर करतात.