पीएनबी बँक घोटाळ्यासोबतच खोट्या हिऱ्यांच्या विक्रीची बातमी पुन्हा एकदा समोर आली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला हिरा आवडत असेल तर तुम्ही खरेदी करताना अगदी सावध राहायला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की आपण खरे आणि खोटे हिरे आपण कसे ओळखू शकता. पुढील स्लाइडमध्ये अस्सल आणि बनावट हिऱ्यांची चाचणी कशी करावी हे जाणून घ्या.
या प्रमाणपत्रात स्टॅम्प आणि स्वाक्षरी असणं आवश्यक आहे. आयआयजी आणि जीआयए प्रमाणपत्रं ही महत्त्वपूर्ण आहेत. कधीही बिलाशिवाय दागदागिने खरेदी करू नका. डायमंडची विश्वसनीयता तपासली जाऊ शकते. आयआयजी, जीआयए किंवा सरकारी लॅबमध्ये याची चाचणी करणे शक्य आहे. दागिने ऑनलाईन खरेदी करताना प्रमाणपत्र व किंमतीकडे लक्ष द्या. पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या आपल्याला घरीच खरे हिरे कसे ओळखता येतील.
एखादा दगड तापवा आणि तो तुटतो की नाही ते पहा : एका संदिग्ध दगडाला 30 सेकादांपर्यंत गरम करा आणि मग पटकन एका थंड पाण्याच्या ग्लासमध्ये टाका. वेगवान प्रसरण किंवा आकुंचनामुळे काच किंवा क्वार्टजसारख्या पदार्थांची तन्यता कमकुवत होते व त्यांचा आतून चुरा होतो. खरा हिरा मजबूत असल्यामुळे त्याला काहीच होत नाही.