झी न्यूज हिंदीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बसून झोपल्याने पाठीच्या कण्याचा आकार खराब होऊ शकतो. यामुळे तुम्हाला पाठदुखी किंवा पाठीला सूज येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
जास्त वेळ अशा स्थितीत झोपल्यामुळे रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजची समस्या उद्भवते. तसेच मुंग्या येणे असा त्रासही होऊ शकतो.
अशा परिस्थिती दीर्घकाळ झोपण्याचे सर्वात मोठे नुकसान म्हणजे यामुळे पायांमध्ये रक्ताच्या गुठळ्या देखील होऊ शकतात, ज्यामुळे कालांतराने चालण्यास त्रास होऊ शकतो.
झोप आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक असते. साधारणपणे बसून झोपणे हानिकारक असते, परंतु काहीवेळा ते आपल्यासाठी फायदेशीरदेखील ठरू शकते. जाणून घेऊया याचे फायदे
गरोदरपणात महिलांना झोपेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. झोपण्याची स्थिती हे सर्वात महत्वाचे असते. काही वेळा महिलांना बसू झोपणे सोयीचे होते. अशा परिस्थिती झोपणे त्यांच्यासाठी खूप आरामदायक असू शकते.
बसून झोपल्याने पोटाच्या अनेक समस्या सुटू शकतात. बसून झोपल्याने काहीवेळा पोटातील गॅसेस आणि बद्धकोष्ठता अशा पोटाच्या समस्या कमी होतात.
काही लोकांना झोपताना झोपेत असताना अनेकांना श्वास घेण्यास त्रास होतो. अशा परिस्थितीत बसू झोपल्याने त्यांचे स्नायू उघडे होतात, ज्यामुळे झोपताना श्वास घेण्यास अडचण येत नाही.