डाळींमध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर असते. देशाच्या सर्व भागांमध्ये डाळी मुख्य आहार बनला आहे. कारण डाळी प्रोटीनचा सर्वात स्वस्त आणि टिकाऊ स्त्रोत आहेत.
डाळी खाल्याचे अनेक फायदे असले. तरी काही लोकांना डाळ, चणे, राजमा हे खाल्ल्यानंतर गॅसेस, सूज येणे, पेटके येणे आणि अपचनाचा त्रास होतो, त्यामुळे लोक डाळी खाणं टाळतात.
अख्या डाळी शिजवण्यापूर्वी किमान 12 तासांपासून ते 24 तासांपर्यंत भिजवू शकता. यामुळे डाळींमधील फायटिक ऍसिड नष्ट होण्यास मदत होईल. चणे, वाटणे यांसारख्या कडधान्याला 48 भिजवून मोड येऊ दिल्यास ते पचायला सोपे जाते.
भिजवण्यासाठी कोमट, अल्कधर्मी पाणी वापरावे. पाण्यात लिंबू पिळून घ्या आणि वेळोवेळी पाणी बदलण्यास विसरू नका.
कडधान्ये शिजवताना त्यांना जास्त वेळ कमी आचेवर शिजवण्याचा प्रयत्न करा. कारण कडधान्यांमधील पचायला जड असलेले फायबर तोडायला वेळ लागतो. तसेच जेव्हा तुम्ही डाळी शिजवता तेव्हा त्यावर येणारा फेस बाहेर काढवा.
डाळीची साईज जितकी मोठी तितकी ती पचायला जड आणि गॅसेस होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे साईजच्या डाळी वेगवेगळ्या शिजवा कारण त्याला वेळही साइजप्रमाणे कमी जास्त लागतो.
डाळीला तूप, लसूण, आले आणि आणि हिंगाची फोडणी तुम्ही देऊ शकता. यामध्ये अँटी-फ्लॅट्युलेंट, गुणधर्म आहेत, यामुळे डाळी पचायला सोप्या होतील आणि तुमच्या जेवणाला विशेष चवदेखील येईल.
राजमा, छोले, कुल्ठी यांसारख्या मोठ्या आणि जास्त वेळ शिजवलेले कडधान्य शक्यतो दुपारच्या जेवणात घ्यावे. तसेच रात्रीच्या जेवणात तुम्ही मूग, तूर आणि मसूर डाळ घेऊ शकता.
डाळी खाल्यानंतर चालणे हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला गॅसेसचा जास्त त्रास असेल तर तुम्ही चणे, उडीद डाळ आणि राजमा यांच्यापेक्षा इतर डाळी खाऊ शकता ज्या पचायला सोप्या आहेत.