आरोग्य फायद्यांसाठी आपण कोणत्याही प्रकारे आवळा खाऊ शकतो. मात्र शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करायचे असेल तर तुम्ही आवळा ज्युस पिणे जास्त फायद्याचे ठरते. आवळ्याच्या ज्यूसमध्ये एक पदार्थ आणखी तुम्ही टाकल्यास कोलेस्टेरॉल सहज कमी होते. पाहूया कसे..
सर्वात आधी आवळ्याचा ज्यूस करून घ्या. यासाठी आवळ्याचे बारीक तुकडे करून ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यानंतर त्याचा रस गाळून वेगळा करा. यानंतर एका भांड्यात 2 कप पाणी टाकून उकळा आणि त्यात अर्जुन साल घाला.
पाणी अर्धे झाल्यानंतर यामध्ये आवळ्याचा रस मिसळा. आता या रसात मध घालून चांगले मिसळा आणि थोडे थंड होऊ द्या. हा ज्युस तुम्ही रोज प्यायलात तर काही दिवसात तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल आणि कोलेस्टेरॉल कमी होऊ लागेल.
आवळा आणि अर्जुन सालाचा रस रस शरीराला व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, टॅनिका आणि फायटोकेमिकल्स देतो, ज्यामुळे आपले आरोग्य सुधारण्यास मदत होते. कोलेस्टेरॉल कमी होण्याव्यतिरिक्तही याचे अनेक फायदे आहेत.
या ज्युसमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. रोगप्रतिकारशक्ती वाढल्यामुळे अनेक लहान सहन आजार आपल्यापासून दूर राहतात.
अर्जुन सालमध्ये फायटोकेमिकल्स असते, जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. जसे की, रक्तदाब नियंत्रित करणे आणि हृदयाची संवेदनशीलता वाढवणे.