पहिल्या पावसानंतर बाजारात मिळणारी, वर्षभर जिची खाद्यप्रेमी आतुरतेने वाट पाहतात, अशा महागड्या भाजीबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. या भाजीचं नाव आहे 'बोडा'. मांसप्रेमीदेखील ही भाजी आवडीने खातात.
बोडाचं वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्णतः नैसर्गिक उत्पादित होणारी भाजी आहे. तीची शेती करता येऊ शकत नाही. ती विशेष प्रकारच्या परिस्थितीत आपोआप उगवते. जंगलात बोडा अगदी मोफत मिळते, मात्र बाजारात तिच्यासाठी अक्षरश: खिसा रिकामा करावा लागतो. 3 ते 4 हजार रुपये किलोने ही भाजी विकली जाते.
बोडा ही एकप्रकारची बुरशी आहे, जिला शास्त्रीय भाषेत 'शोरिया रोबुस्टा' असं म्हणतात. मात्र भाजी म्हणून ती अतिशय स्वादिष्ट लागते. छत्तीसगडच्या विविध जिल्ह्यांमध्ये तयार होणाऱ्या या भाजीला काळं सोनं असंदेखील म्हणतात.
सालच्या जंगलांमध्ये जेव्हा पहिल्या पावसात माती ओली होते आणि पहिल्यांदा जी आर्द्रता निर्माण होते. तेव्हा साल वृक्षाच्या मुळांमधून एक विशिष्ट्य प्रकारचा द्रव बाहेर पडतो. त्यानंतर जमिनीवर पडणाऱ्या सालच्या वाळलेल्या पानांखाली ही बुरशी तयार होते. आदिवासी लोक लाकडाने तिला सुरक्षितपणे जमिनीबाहेर काढतात.
बुरशी असूनही ही भाजी एवढी महाग का? कारण तिच्यात सर्व प्रकारची जीवनसत्त्वे, प्रथिने आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. तसेच ही भाजी कुपोषण, हृदय आणि पोटाच्या आजारांवर उपयुक्त मानली जाते.