अनेक अभ्यासांमध्ये असे आढळले की, आरओ पाण्यात आवश्यक खनिजे काढून टाकले जातात, ज्यामुळे शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नेही याबाबत अनेकदा इशारा दिला आहे.
वैज्ञानिकदृष्ट्या हेही सिद्ध झाले आहे की, रिव्हर्स ऑस्मोसिसवर आधारित तंत्रज्ञानाने पाणी शुद्ध करताना पाण्यात असलेले अनेक पोषक घटक नष्ट होतात. त्यामुळे कावीळ, अशक्तपणा, नवजात बालकांच्या विकासातील समस्या असे अनेक प्रकारचे धोके निर्माण होऊ लागतात.
एका अभ्यासात असे आढळले की, जेव्हा झेक आणि स्लोव्हाक देशांतील लोकांनी आरओ पाणी पिण्यास सुरुवात केली. तेव्हा काही आठवड्यांतच त्यांच्यामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमची तीव्र कमतरता होऊ लागली. याशिवाय अनेक प्रकारची गुंतागुंत समोर येऊ लागली. आरओचे पाणी प्यायल्यानंतर थकवा, अशक्तपणा, स्नायू दुखणे आणि हृदयाशी संबंधित समस्याही या लोकांमध्ये दिसू लागल्या.
नैसर्गिक पाण्याच्या तुलनेत आरओ पाणी खनिजांची भरपाई करू शकत नाही. जी काही खनिजे इतर माध्यमातून शरीरात जातात, आरओचे पाणीही त्यांनादेखील खेचून घेते. म्हणजेच फळे, अन्नपदार्थ इत्यादींमधून मॅग्नेशियम, कॅल्शियम आपल्या शरीरात जाते, तेव्हा आरओ पाण्याच्या दुष्परिणामामुळे ते लघवीत बाहेर येते.
आरओचे पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्यात विरघळणारे इलेक्ट्रोलाइट्स पातळ होतात. इलेक्ट्रोलाईड्स हे रक्तामध्ये विरघळलेले खनिजे असतात, ज्यामुळे विद्युतभारित द्रव इकडून तिकडे शरीरात जातात. त्यामुळे थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी, स्नायू दुखणे आदी तक्रारी होतात. कधी कधी हृदयाचे ठोकेही जलद होतात.
आरओ पाणी प्यायल्याने शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता होऊ शकते. संशोधनात हे समोर आले आहे की, आरओचे पाणी जास्त काळ प्यायल्याने व्हिटॅमिन बी12 ची कमतरता होऊ शकते आणि व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे अॅनिमिया होऊ शकतो.
आरओ पाण्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि पाणी स्वच्छ करण्यासाठी या पद्धती वापरता येतात. उदाहरणार्थ आरओशिवाय पाणी उकळून प्या. प्रति लिटर स्वच्छ पाण्यात आयोडीनचे 5 थेंब टाका. याशिवाय एक लिटर पाण्यात लिक्विड ब्लीचचे चार थेंब टाकूनही पाणी स्वच्छ करता येते.