डिसेंबरमध्ये फिरण्यासाठी बेस्ट आहेत ही ठिकाणं, नवीन वर्षाचं स्वागतही इथं दणक्यात होईल
डिसेंबरच्या गुलाबी थंडीत बऱ्याचदा लोक फिरण्याचे प्लॅन्स करतात. त्यातच थंडीसोबत ख्रिसमस आणि नवीन वर्ष हे एन्जॉय करण्यासाठीही लोक फिरायला जातात. आज आम्ही तुम्हाला डिसेंबरमधील काही ठिकाणांबद्दल माहिती देणार आहोत.
तुम्ही फिरायला जाण्यासाठी ठिकाणं शोधत असाल. तर आम्ही तुमच्यासाठी काही अप्रतिम ठिकाणांची यादी घेऊन आलो आहोत. या ठिकाणी तुम्ही तुमच्या सुट्ट्या अगदी आनंदात साजऱ्या करू शकता.
2/ 8
रण आणि कच्छ : तुम्हाला एखादा वेगळा अनुभव घ्यायचा असेल. तर तुम्ही रण आणि कच्छला जाऊ शकता. दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत येथे रण महोत्सव साजरा केला जातो. कला, संस्कृती आणि संगीत यांचा अनोखा संगम या महोत्सवात पाहायला मिळतो.
3/ 8
अलेप्पी : केरळ हे कायमचा पर्यटकांचे आवडते ठिकाण असते. केरळमधील अलेप्पी हे बॅकवॉटर हाउसबोट्ससाठी प्रसिद्ध आहे. अनेकांना हाऊसबोटमध्ये रात्र घालवण्याची इच्छा असते. त्यांच्यासाठी हे खूप उत्तम ठिकाण आहे.
4/ 8
गोवा : गोवा म्हणलं एक उनाड ट्रिप सर्वांच्या डोळ्यासमोर येते. गोव्याबद्दल वेगळी माहिती देण्याची गरज नाही. गोव्यात ख्रिसमस आणि नवीन वर्ष खूप उत्साहात साजरे करतात. यावेळी इथे अनेक विदेशी पर्यटकही येतात.
5/ 8
मनाली : मनाली हे केवळ एकाच ऋतूसाठी नाही. तर ऑफ सिझनमध्येही हजारो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. हिवाळ्यात मनालीचे सौंदर्य आणखी वाढते. हा अद्भुत अनुभव तुम्ही नक्की घ्यावा.
6/ 8
पुद्दुचेरी : पुद्दुचेरी हे सुंदर लँडस्केपसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला भारताची पारंपारिक संस्कृती तसेच फ्रेंच वास्तुकला पाहायला मिळेल. डिसेंबर महिन्यात इथला प्रवास तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो.
7/ 8
औली, उत्तराखंड : औली हे ठिकाण शंकूच्या आकाराचे जंगले, बर्फ आणि ओक वृक्षांनी वेढलेले आहे. यात काही चित्तथरारक दृश्ये देखील आहेत. हिवाळ्यात औलीला भेट देताना, तुम्ही स्कीइंग व्यतिरिक्त इतर चेअर कार राइड आणि ट्रेकिंगदेखील करू शकता.
8/ 8
कुर्ग, कर्नाटक : कुर्ग हे क्षेत्र निसर्गरम्य दृश्ये आणि हिरवेगार कॉफी फार्म यासाठी ओळखले जाते. हे अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने वेढलेले आहे. डोंगरांना स्पर्श करणारे आकाश आणि हलणारे ढग यामुळे या सुंदर शहराला भारताचे स्कॉटलंड असेही संबोधले जाते.